कर्नाटक सरकारच्या ‘शू भाग्य’ योजनेत मोठा घोटाळा झाला असून, या माध्यमातून स्थानिक दलित चर्मोद्योग कारागिरांवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप अखिल कर्नाटक चर्मकार समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल सौदागर यांनी केला आहे. बेळगाव येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

राज्यातील ३६.५६ लाख विद्यार्थ्यांसाठीच्या शूज खरेदीचे १०४ कोटी रुपयांचे टेंडर दिल्लीतील कंपनीला देण्यात आले आहे. यामुळे राज्यातील चर्मकारांना रोजगारापासून वंचित ठेवून सरकारने त्यांच्याशी द्रोह केल्याचे सौदागर म्हणाले. हे टेंडर तातडीने रद्द करण्याची मागणी महासंघाने केली आहे.

या संदर्भात महासंघाच्या नेत्या प्रेमा भंडारी यांनीही आक्षेप नोंदवत, दिल्लीचे टेंडर रद्द करून स्थानिक कारागिरांना काम देण्याची मागणी केली. या अन्यायाविरोधात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे लवकरच शिष्टमंडळ नेऊन दाद मागितली जाईल, असे अनंतकुमार ब्याकुड यांनी स्पष्ट केले.


Recent Comments