चिक्कोडी तालुक्यातील नागराळ गावात श्री नाथ संतांचा दरबार सद्भक्त मंडळाच्या वतीने आयोजित ५ व्या वर्षाच्या पंढरपूर आषाढी पायी दिंडीचे भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले.

नागराळ येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांनी एकत्र येत विशेष पूजा केली. त्यानंतर गावात भजन-कीर्तनासह प्रदक्षिणा घालून या पायी दिंडीची सुरुवात करण्यात आली. नागराळ येथून निघालेली ही दिंडी २६ जुलै २०२६ पर्यंत पंढरपूरकडे मार्गक्रमण करणार आहे.

याप्रसंगी सुनील माळी आणि सावकार कांडागावे यांनी सांगितले की, नागराळ येथून निघालेली ही पायी दिंडी सलग ८ दिवस चालणार आहे. भाविक सांसारिक चिंता विसरून केवळ पांडुरंगाच्या नामस्मरणात पावले टाकत आहेत. या पवित्र यात्रेत सुमारे २०० हून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.

या सोहळ्याप्रसंगी सावकार कांडागावे, नरसू बिकूमाळी, मळ्ळू पारगावे, अण्णासाहेब खानापुरे, नाना माळी, प्रीतम माळी, मुरली महाराज, शिवा माळी, श्रीशैल पारगावे, गणू माळी, गजू माळी, संतोष माळी, राम माळी, बबलु माळी, शिवाजी कांडागावी यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.



Recent Comments