Dharwad

धारवाडच्या बेलूर औद्योगिक क्षेत्रात सिमेंट ब्लॉक कारखान्यात अपघात

Share

धारवाड बेलूर औद्योगिक क्षेत्रातील लाईट वेट सिमेंट ब्लॉक बनवणाऱ्या कारखान्यात लोखंडी यंत्र अंगावर पडल्याने सात कामगार जखमी झाले.

ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली असून, जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात राजूकुमार या कामगाराच्या पोटात लोखंडी सळई घुसली असून, रमेश मांथ यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. इतर पाच कामगारांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. हा कारखाना सध्या अस्ट्रॅटेक कंपनीकडून चालवला जात असून, अपघातानंतर गरगा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

Tags: