धारवाड तालुक्यातील करडीगुड्डा गावात शालेय मुले आणि ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. भाजप नेते मंजुनाथ मक्कळगेरी यांच्या संकल्पनेतून आणि सेवा भारती ट्रस्टच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामीण भागातील नागरिक आणि शालेय मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आज अत्यंत गरजेचे आहे. मुलांनी बेकरी उत्पादने आणि जंक फूड खाणे पूर्णपणे बंद केले पाहिजे, असे आवाहन भाजप नेते मंजुनाथ मक्कळगेरी यांनी केले. पालकांनी आपल्या मुलांना घरात तयार केलेले ताजे आणि पौष्टिक अन्न देण्याला प्राधान्य द्यावे, अशी प्रतिक्रिया मंजुनाथ मक्कळगेरी यांनी दिली.

सध्या शालेय मुलांमध्ये अशक्तपणा आणि रक्तक्षयाची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आपल्याला पारंपारिक आणि पौष्टिक अन्नपद्धतीचा अवलंब करावा लागेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या शिबिरात करडीगुड्डा गावातील शासकीय शाळा आणि ग्रामदेवी मंदिर परिसरात शेकडो नागरिकांनी व मुलांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. उपस्थित डॉक्टरांनी रुग्णांना मोफत तपासणी करून आवश्यक औषधोपचार आणि आरोग्याविषयी मोलाचा सल्ला दिला.


Recent Comments