Khanapur

अपघातातील जखमींच्या मदतीला धावले माजी आमदार

Share

खानापूर तालुक्यातील जुन्या पुलाजवळ दुचाकीसमोर अचानक कुत्रा आल्याने झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर याच मार्गावरून प्रवास करणारे माजी आमदार अरविंद पाटील यांनी तातडीने जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली.

बेळगावच्या उद्यमबाग येथून काम संपवून कारलगा गावाकडे परतत असताना काशीनाथ रावळू आणि गोरे या दोन युवकांचा हा अपघात झाला. रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या या युवकांना माजी आमदारांनी पाहिले.

अरविंद पाटील यांनी तातडीने आपले वाहन थांबवून जखमी युवकांना प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर त्यांना स्वतःच्या वाहनातून खानापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करून पुढील उपचाराची व्यवस्था केली.

Tags: