Khanapur

“पाली शाळेची विद्यार्थीनी इनस्पायर आवार्ड स्पर्धेसाठी जपानला रवाना”

Share

पाली (ता.खानापूर ) सारख्या घनदाट जंगलातील अतीत दुर्गमभागातील उच्च प्राथमिक शाळेची विध्यार्थीनी अक्षरा दुलबा माळीक हिचे. जपान येथे होणार्या इनस्पायरआवार्ड ( Inspire Award )स्पर्धे साठी निवड झाली.ती भाग घेण्यासाठी नुकताच जपान ला रवाना झाली.

यावेळी अक्षरा दुलबा माळीक ही पाली गावाची विद्यार्थिनी जपान दौऱ्यासाठी रवाना होण्यासाठी खानापूर बस स्थानकात आली असता. तिला शुभेच्छा देण्यासाठी खानापूर तालुक्याचे क्षेत्र शिक्षणाधिकारी पी रामाप्पा ,क्षेत्र संपन्नमूल्य अधिकारी मंजुनाथ हत्ती, अक्षरदासह अधिकारी विनायक जकाती, पीएमश्रीमुख्याध्यापक शंकर कमार, बी आर पी संतोष नाईक , टी बी मोरे, चचडी बाळासाहेब देसाई, राजकुमार, प्राथमिक शिक्षक संघांचे अध्यक्ष चवलगी,प्रधान कार्यदर्शी बी बी चपगावंकर, उपाध्यक्ष के एच कौंदलकर, खजिनदार किरण पाटील, सह कार्यदर्शी रमेश कवळेकर, संचालक श सतीश हळदणकर, संचालक महेश हेबाळकर, संचालक पिराजी पाखरे, सरकारी नोकरी संघाचे संचालक बापू दळवी,तिओली शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर गावडे आदी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

तिचा प्रवास सुखकर व्हावा व तिने खानापूर तालुक्याचा जागतिक पातळीवर नावलौकिक केले म्हणून.. खानापूर तालुक्याचे लोकप्रिय माननीय आमदारानी . प्रवासाच्या संपूर्ण खर्च व दिल्ली येथे राहण्याची व्यवस्थेचा संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्वतः आमदारानी घेतली. तसेच खानापूर तालुक्याचे क्षेत्र शिक्षणाधिकारी पी रामाप्पा यांनी प्रोत्साहन धन म्हणून रोख रुपये दहा हजार चे बक्षीस दिले. तसेच शिरोली केंद्रातील सर्व शिक्षकांनी प्रोत्साहन धन दिले व प्राथमिक शिक्षक संघाने देखील भरघोस अशी मदत केली.
व तिला स्पर्धेसाठी यश मिळावे म्हणून शुभेच्छा दिली.

Tags: