खानापूर तालुक्यातील महत्त्वाचा संपर्क मार्ग असलेल्या हलियाळ-बेळगाव राज्य महामार्गावरील बिडी ते लिंगनमठ दरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे.


सदर मार्गावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे दुचाकी, कार, बस आणि मालवाहू ट्रक चालवताना चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या दुरवस्थेमुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले असून, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणेही कठीण जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.


पावसाळा सुरू झाल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहतुकीची कोंडी होण्याची आणि रस्ता अधिक खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन तत्परतेने डांबरीकरण किंवा तात्पुरती दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


Recent Comments