Khanapur

खानापूर पोलिसांनी राबवली ड्रग्जविरोधी जनजागृती मोहीम

Share

मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि महाविद्यालयीन प्रशासनाचे सहकार्य
खानापूर पोलीस ठाण्याच्या वतीने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

खानापूर येथील केएलई कॉलेज आणि मराठा मंडळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देऊन त्यांना व्यसनापासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली.

खानापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय निरंजनस्वामी, प्रोबेशनरी पीएसआय बसवराज आणि शिल्पा यांनी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली. युवकांनी ड्रग्ज आणि इतर व्यसनांपासून दूर राहून एक चांगला व सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन या वेळी पोलीस अधिकाऱ्यांनी केले. या मोहीमेत पोलीस कर्मचारी सिद्राम हसारे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून हा अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. या वेळी कॉलेजचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: