खानापूर तालुक्यातील गवाळी भागात मुसळधार पावसामुळे वीज खांब कोसळल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. तसेच देवगाव रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडल्याने वाहतूक आणि जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे.

दाट वनक्षेत्र असलेल्या खानापूर तालुक्यातील गवाळी परिसरात मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या या मुसळधार पावसामुळे वीज खांब मोडून पडले आहेत. याशिवाय देवगाव रस्त्यावरील जंगल परिसरात झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने पादचाऱ्यांचा मार्गही बंद झाला आहे. या परिस्थितीवर संताप व्यक्त करताना गवाळी येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद गावडे यांनी, लोकप्रतिनिधींनी या समस्यकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

आता तरी संबंधित हेस्कॉम (HESCOM) आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन रस्त्यावरील फांद्या हटवाव्यात आणि वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.


Recent Comments