Khanapur

“दारोळीत वीज पुरवठा खंडीत पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात वनवन”

Share

खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अति घनदाट जंगलातील निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील दारोळी गावचा वीज पुरवठा खंडीत होऊन गावाला पिण्याची समस्या भेडसावित आहे.
गावात वीज पुरवठा खंडीत झाल्यापासुन गावातील कुपनलिकाच बंद झाल्यात्यामुळे पिण्याची पाण्याची सोय नाही. दुसरी कड़े गावात विहीर सुध्दा नाही.

त्यामुळे दारोळी गावकर्याना पाण्यासाठी दुचाकीवरून गावापासुन बर्याच अंतरावर जाऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे.असे किती दिवस चालणार.

यासाठी हेस्काॅम खात्याकडुन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी खानापुरच्या आमदारानी याकडे लक्ष देऊन हेस्काॅम च्या अधिकार्याना सुचना कराव्यात.अन्यथा हेस्काॅम कार्यालयावर दारोळी ग्रामस्थाचा धडक मोर्चा काढुन अधिकार्याना घेराव घालुन जाब विचारणाचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.

Tags: