Bellary

बळ्ळारीत भरधाव बोलेरो कार उलटली

Share

बळ्ळारी शहरात एक मोठी दुर्घटना टळली आहे. एपीएमसी बाजार समितीच्या आवारात वेगाने आलेली बोलेरो कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मध्यभागीच उलटली. कारमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिक नागरिकांनी तातडीने बाहेर काढले.

वाहन उलटल्याचा आवाज होताच परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने चालकाचा जीव वाचला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

या अपघाताची नोंद एपीएमसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Tags: