खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांचे बंधू आणि निवृत्त पोस्टमास्तर मारुती नारायण दळवी (वय ६८, रा. मंगतूर्गा) यांचे मंगळवारी बेळगावच्या केएलई रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

सोमवार, २२ जून रोजी छत्रपती शिवाजीनगर येथे त्यांच्या बाईकला अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी बेळगावच्या केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी रात्री आठ वाजता त्यांच्या मणतुर्गा या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



Recent Comments