Khanapur

“खानापूर सरकारी पी. यू. काॅलेजला सुविधा पुरवा.”

Share

खानापूर शहरातील सरकारी पी यू काॅलेज व हायस्कूलच्या विकासासाठी विकास समितीच्या वतीने कॅनरा लोकसभा मतदार संघाचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी हे रविवारी खानापूरला धावत्या भेटीवर आले असता.त्याची भेट घेऊन खानापूर शहरातील सरकारी पी यू काॅलेजच्या पायाभुत सुविधा व विकासाबाबत खानापूर तालुक्याचे आमदार यांच्या उपस्थितीत खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी याना सरकारी पी यू काॅलेजचे उपाध्यक्ष प्रसन्ना कुलकर्णी व सदस्यानी निवेदन दिले.
यावेळी निवेदनाचा स्विकार करून खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यानी काॅलेजच्या विकीसासाठी अनुदान मंजुर करू असे आश्वासन दिले.
निवेदनात म्हटले आहे.की, सरकारी पी यू काॅलेजचे ६२० विद्यार्थी असुन विद्यार्थी वर्गाला बसायला.डेक्स नाहीत.तसेच शौचालय सह वर्ग खोल्याची कमतरता आहे. व इतर सुविधाची कमरता असल्याने विद्यार्थी वर्गाची गैरसोय होत आहे.
तेव्हा खासदार फंडातुन काॅलेजच्या विकासासाठी निधी मंजूर करावा.
निवेदन देताना उपाध्यक्ष प्रसन्ना कुलकर्णी,श्री पी एम अध्यक्ष रमेश पुजारी आदी उपस्थित होते.

Tags: