खानापूर तालुक्यातील कसबा नंदगड येथे श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास योजनेच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत रोपे वाटप करण्याच्या हरित मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

नंदगड विभागाचे पर्यवेक्षक सुरेंद्र अजगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूज्य खावंद यांच्या संकल्पनेतून कारलगा, कसबा नंदगड आणि हलसी परिसरातील शेतकरी बांधवांसाठी ही मोफत रोपवाटप मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या भागात मोठ्या संख्येने रोपांचे वाटप करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी स्वयंसहायता समूहातील महिला, प्रगतशील शेतकरी आणि योजनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments