Dharwad

धारवाड जिल्हा न्यायालयात बॉम्बची धमकी; ईमेल आल्याने खळबळ

Share

धारवाड जिल्हा न्यायालयाला ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने परिसर काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाचे कामकाज तात्काळ थांबवून सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि तपास सुरू केला.

धारवाड जिल्हा न्यायालयाला यापूर्वीही अशाच प्रकारचा धमकीचा ईमेल आला होता. आता पुन्हा एकदा एका अज्ञात पत्त्यावरून संशयास्पद ईमेल आला असून, दुपारी दोन वाजता न्यायालयाच्या आवारात स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. कालचा प्रकार हा केवळ एक सराव होता आणि आज प्रत्यक्ष स्फोट घडवला जाईल, असा उल्लेख या संदेशात करण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले. या पथकाने न्यायालयीन इमारतीसह संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या धारवाड जिल्हा न्यायालय परिसरात पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Tags: