Hukkeri

हुक्केरी : चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत

Share

हुक्केरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडच्या काळात चोरीला गेलेले आणि हरवलेले २२ मोबाईल फोन हुक्केरी पोलिसांनी शोधून काढून त्यांच्या मूळ मालकांना म्हणजेच वारसांना परत केले आहेत.

गोकाकचे डीवायएसपी रवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली हुक्केरीचे पोलीस निरीक्षक शिवशंकर गणाचारी आणि पीएसआय सतीश एच. यांनी सुमारे २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे हे २२ मोबाईल फोन त्यांच्या वारसांकडे सुपूर्द केले. आपले हरवलेले मोबाईल फोन पुन्हा हातात मिळाल्यानंतर वारसांनी पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.

याप्रसंगी पोलीस कर्मचारी अर्जुन मसरगुप्पी, गुन्हे शाखेचे कर्मचारी मंजुनाथ कब्बूर, राजू पडतरे, कुमार करेन्नावर यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Tags: