Bagalkot

वीज वितरण कंपन्यांच्या खाजगीकरणाविरोधात बागलकोटमध्ये शेतकरी आक्रमक

Share

राज्य सरकारने वीज वितरण कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने वीज वितरण कंपन्यांच्या खाजगीकरणाविरोधात आता बळीराजा रस्त्यावर उतरलाय आणि बागलकोटमध्ये सरकारविरोधात तीव्र संतापाचा उद्रेक पाहायला मिळतोय.

राज्य सरकारने वीज वितरण कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने बागलकोटमधील शेतकरी आणि कन्नड संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणारी मोफत वीज आणि इतर सवलती धोक्यात येणार असून, सरकारने हा निर्णय त्वरित मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यापूर्वी केंद्र सरकारच्या खाजगीकरण धोरणाचा विरोध करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी आता स्वतः सत्तेत आल्यावर राज्यात तेच धोरण राबवण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या दुटप्पी भूमिकेविरोधात बागलकोटमध्ये एकत्र आलेल्या शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.

वीज क्षेत्राचे खाजगीकरण झाल्यास मोफत वीज योजनेला फटका बसेल, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली आहे. तसेच शेतीपंपांना वीजपुरवठा, कूपनलिका जोडणी आणि ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती अशा प्रत्येक कामासाठी शेतकऱ्यांना वीज वितरण कंपन्यांवर अवलंबून राहावे लागेल व आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Tags: