बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील सुळेभावी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आज ग्रामस्थांनी आंदोलन करत, जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आरोग्य विभागाच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील सुळेभावी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी रुग्णालयासमोर धरणे आंदोलन केले. रुग्णालयातील ढिसाळ कारभाराचा निषेध करत आंदोलकांनी रिक्त असलेली सर्व पदे तातडीने भरण्याची मागणी सरकारकडे केली.

वेळेवर कर्तव्यावर न येणाऱ्या डॉक्टरांविरोधात घोषणाबाजी करत, अधिकाऱ्यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळणे थांबवावे आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवा तात्काळ सुधारण्यात यावी, अशी मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिले.


Recent Comments