Athani

अथणीत घराबाहेर उभ्या केलेल्या दुचाकींमधून पेट्रोल चोरी

Share

बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात रात्रीच्या वेळी घरांसमोर पार्क केलेल्या दुचाकींमधून पेट्रोल चोरणारी टोळी सक्रिय झाली असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांची रात्रीची गस्त सुरू असतानाही या चोऱ्या होत असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

अथणी शहरातील जत रस्त्याला लागून असलेल्या बडकंबी तोट आणि श्री रामलिंग मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास आलेल्या चोरांनी घरांसमोर लावलेल्या दुचाकींच्या पेट्रोल पाईप कापून पेट्रोल चोरी करत पळ काढला. गेल्या पंधरा दिवसांतील या भागातील पेट्रोल चोरीची ही तिसरी घटना आहे. चोरांचे हे कृत्य स्थानिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून चोरांना पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नसल्याचे दिसत आहे. या चोरांचा शोध घेऊन तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अथणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

Tags: