बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लोंढा वनक्षेत्रात बिबट्याचा वावर सुरूच असून यामध्ये एका शेतकऱ्याच्या पाळीव बैलाचा मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली असून नियमांनुसार योग्य भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.

लोंढा वनक्षेत्राच्या व्याप्तीतील घोशे के.एच. गावातील सर्व्हे नंबर ३५ मध्ये बिबट्याने हल्ला करून एका बैलाला ठार केल्याची घटना घडली आहे. हा मृत बैल जटगे गावातील शेतकरी राजाराम नारायण पाटील यांच्या मालकीचा होता. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

प्राथमिक तपासानुसार हा बिबट्या किंवा वाघाचा हल्ला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सरकारी नियमावलीनुसार पीडित शेतकऱ्याला लवकरच नुकसानभरपाई मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती खानापूरचे एसीएफ बसवराज वाळद यांनी दिली आहे.


Recent Comments