Bagalkot

जमीर अहमद खान यांना तातडीने मंत्रीपद देण्याची मागणी

Share

बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूरमध्ये जमीर अहमद खान यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

बागलकोट मधील महालिंगपूर शहरात जमीर अहमद खान यांच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाचे नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. महम्मदिया अंजुमन कमिटीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महालिंगपूर आणि आसपासच्या गावांतील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. शहरातील मुख्य चौकांमध्ये जमीर अहमद खान यांचे फोटो हातात घेऊन त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जमीर अहमद खान हे समाजाचे प्रमुख नेते असून त्यांना तातडीने मंत्रीपद देऊन योग्य प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मंत्रीपद देण्यास टाळाटाळ केल्यास आगामी दिवसांत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महम्मदिया अंजुमन कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. सध्या शहरात आंदोलनाचा प्रभाव वाढला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Tags: