आमदार लक्ष्मण सवदी यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यावे या मागणीसाठी मातंगी समाजाच्या वतीने स्थानिक मातंगी मंदिर आणि दुर्गादेवी मंदिरात विशेष पूजा अर्चा करण्यात आली. या पूजेनंतर राज्य सरकारकडे मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.


आमदार लक्ष्मण सवदी यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या विजयासाठी प्रामाणिक कष्ट घेतले असून, मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या अथणी मतदारसंघाचा सिंचन योजना व रस्ते याद्वारे विकास केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सर्व घटकांना सोबत घेऊन चालणाऱ्या सवदी यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन उत्तर कर्नाटकातील पक्ष संघटना बळकट करावी, अशी मागणी ॲड. प्रमोद हिरेमणी यांनी केली आहे.


या कार्यक्रमात युवा नेते चिदानंद सवदी , रामनगौडा पाटील, मंजू होळीकट्टी, आदर्श गस्ती, प्रकाश हेग्गण्णावर, शंकर मुरुगुंडी, करण हिरेमणी, महेंद्र राजंगळे, महादेवी होळीकट्टी, कमला हिरेमणी यांच्यासह मातंगी समाजाचे प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.


Recent Comments