घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला असून, विजापूरमधील महिलांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


दिवसेंदिवस वाढणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये आता एलपीजी गॅसच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेले गॅसचे दर अचानक वाढल्याने मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचे बजेट कोलमडले असून, पेट्रोल-डिझेल महागल्याने भाजीपाला आणि किराणा सामानही महागले आहे. या दरवाढीमुळे विजापूरमधील महिलांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.


गॅस दरवाढीचा फटका केवळ घरांनाच नाही, तर हॉटेल व्यावसायिक आणि वाहतूक क्षेत्रालाही बसत आहे. व्यावसायिक सिलिंडर महागल्याने खाद्यपदार्थांचे दर वाढण्याची शक्यता असून, केंद्र सरकारच्या या धोरणावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. केंद्र सरकारने गॅस दरवाढ त्वरित नियंत्रणात आणावी, अशी मागणी एम. बी. पाटील यांनी केली आहे.

एकंदरीत, गॅस दरवाढीमुळे स्वयंपाकघरापासून ते हॉटेल व्यवसायापर्यंत सर्वांचेच आर्थिक गणित बिघडले असून, सरकार यावर काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments