विजापूरमध्ये रविवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.

शहरात सुमारे तीन तास सलग झालेल्या या पावसामुळे सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले असून, नागरिकांना रात्रभर पाणी उपसण्याचे काम करावे लागले.

मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. काही ठिकाणी वाहने पाण्यात अडकल्याने चालक आणि प्रवाशांची तारांबळ उडाली.
पावसाच्या तीव्रतेमुळे सांडपाण्याची यंत्रणा कोलमडून रस्ते जलमय झाले होते. या पार्श्वभूमीवर, पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी विजापूरमधील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.


Recent Comments