अथणी तालुक्यातील जनवाडा गावाजवळ कृष्णा नदीच्या काठावर सुरू असलेल्या मातीची अवैध वाहतूक आणि उत्खननाबाबत ‘इन् न्यूज’ने वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची दखल घेत खाण आणि भूविज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.


बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील जनवाडा गावाबाहेर संगप्पा पानशेट्टी यांच्या मालकीच्या ९ गुंठे आणि कर्नाटक सिंचन निगमच्या १३ गुंठे जमिनीतून मोठ्या प्रमाणावर मातीचे अवैध उत्खनन आणि वाहतूक झाल्याचे समोर आले असून या प्रकरणी तपास सुरू आहे.


या संदर्भात बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी योग्य तपास करून संबंधित वाहन मालकांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे, या अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश अथणीचे तहसीलदार सिद्धराय भोसगी यांनी दिले असून, यामुळे दोषी अधिकारी, जमीन मालक आणि वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.


Recent Comments