बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ जवळील बिदरी गावातील प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यानेच मूर्ती आणि दागिन्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुधोळ पोलिसांनी मुख्य आरोपी पुजाऱ्याला अटक केली आहे.

बिदरी गावातील जनता प्लॉटमध्ये असलेल्या अंबाबाई मंदिरात हा प्रकार घडला. मंदिराचा पुजारी वसंत यानेच गाभाऱ्यातील अंबाबाईची बोंगाळे मूर्ती आणि लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. मंदिरातील दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच मुधोळ पोलिसांनी वेगाने तपास करून संशयित पुजारी वसंत याला अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून लाखो रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले असून त्याला न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.



Recent Comments