खानापूर पोस्ट ऑफिसमध्ये ४० वर्षे पोस्टमन म्हणून सेवा बजावून निवृत्त झालेले सुरप्पा कृष्णा पाटील यांचा खानापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष अमृत शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खानापूरमध्ये आयोजित निवृत्ती सोहळ्यात पाटील यांना निरोप देण्यात आला.


खानापूर तालुक्यातील मर्तुगा येथील रहिवासी असलेले सुरप्पा कृष्णा पाटील हे खानापूर पोस्ट ऑफिसमधून निवृत्त झाले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात खानापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष अमृत शेलार यांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या सत्कार समारंभाला ज्येष्ठ पत्रकार वासुदेव चौगुले, पोस्ट ऑफिसचे अधिकारी, कर्मचारी आणि इतर नागरिक उपस्थित होते.


Recent Comments