पंचमसाली समाजाचे ज्येष्ठ नेते आणि सलग सहा वेळा आमदार राहिलेले मंत्री शिवानंद एस. पाटील यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन राज्य सरकारने समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी मनगुळी येथील विरक्तमठाचे संगनबसवा श्री यांनी केली आहे.

विजापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मंत्री शिवानंद पाटील यांच्या दीर्घ राजकीय अनुभवाचा उल्लेख केला. शिवानंद पाटील हे लोकप्रतिनिधी म्हणून खंबीरपणे कार्यरत असून त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यास तो पंचमसाली समाजाचा मोठा सन्मान ठरेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून पाटील यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.



Recent Comments