Bagalkot

बदामीतील ‘अक्का-तंगी’ धबधबा झाला प्रवाहित

Share

ऐतिहासिक शहर बदामीमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे निसर्गाचे एक अनोखे रूप पाहायला मिळत आहे. बदामीमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला ‘अक्का-तंगी’ हा धबधबा पूर्ण वेगाने ओसंडून वाहत असून, दुधासारखा पांढराशुभ्र दिसणारा हा विहंगम नजराणा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.

बागलकोट जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ असलेल्या बदामीमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध ‘अक्का-तंगी धबधबा ‘ ओसंडून वाहत असून या दृश्याने नागरिकांना भुरळ घातली आहे. येथील सुप्रसिद्ध भूतनाथ मंदिराच्या पाठीमागील डोंगरावरून दुधाच्या फेसासारखा खाली झेपावणारा हा धबधबा बदामीच्या निसर्ग सौंदर्यात अधिकच भर घालत आहे. वर्षाच्या पहिल्याच पावसात हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत असल्याचे पाहून स्थानिक नागरिक आणि पर्यटक सुखावले असून, निसर्गाचा हा अद्भूत नजराणा डोळ्यात साठवत सेल्फी घेण्याचा आनंद लुटत आहेत.

Tags: