Vijayapura

विजापूरमध्ये मालमत्तेच्या वादातून ६ जणांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

Share

विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात मालमत्तेच्या वादातून ६ जणांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

गावातील निराळे आणि गोळगी कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. याच पूर्ववैमनस्यातून हे भीषण हत्याकांड घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे आणि शब्बीर नदाफ यांच्यासह एकूण ६ जणांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या हत्याकांडामुळे गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हत्येचे नेमके कारण आणि घटनेचा सविस्तर तपशील पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.

Tags: