बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंदमध्ये पोलिसांनी सलग होणाऱ्या चोरी आणि दरोड्याच्या घटनांना चाप लावत आरोपींना अटक केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण ४६.९९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद, अमीनगड आणि इलकल पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात हुनगुंद पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ४६.९९ लाख रुपये किमतीच्या ५४ दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. अटक केलेल्या आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवणाऱ्या चोरांना पकडल्याबद्दल पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.





Recent Comments