खानापूर प्रादेशिक वन उपविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक सुनीता निंबरगी यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी शासनाने बेळगावमधील कार्ययोजना विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक बसवराज वाळद यांची नियुक्ती केली आहे. या प्रशासकीय फेरबदलाचे आदेश शासनाने अधिकृतपणे जारी केले आहेत.

खानापूर प्रादेशिक वन उपविभागात नवीन सहाय्यक वनसंरक्षक म्हणून बसवराज वाळद यांची नियुक्ती करण्यात आली असून, येथे कार्यरत असलेल्या सुनीता निंबरगी यांची धारवाडमध्ये बदली करण्यात आली आहे. यापूर्वी खानापूर तालुक्यात परिक्षेत्र वनअधिकारी म्हणून कर्तव्य बजावलेले बसवराज वाळद हे सध्या बेळगावमधील कार्ययोजना विभागात कार्यरत होते. वनसंपत्तीने समृद्ध असलेल्या खानापूर तालुक्यात पुन्हा एकदा कार्यक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे.



Recent Comments