DEATH

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कणखर ज्येष्ठ नेते अर्जुनराव गोरल यांचे निधन

Share

बेळगाव – महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, माजी जिल्हा परीषद सदस्य अर्जुनराव नागोजी गोरल( वय 77) यांचे निधन गुरुवार दि. 21 दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन करते चिरंजीव, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
अंत्यविधी उद्या शुक्रवारी (दि.22 रोजी) सकाळी 10 वाजता मंगाई नगर येथील त्यांच्या पोल्ट्री फार्म जवळ होणार आहे.
त्यांच्या निधनाने सीमाभागावर शोककळा पसरली आहे. समिती कार्यकर्त्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूरचा बुलंद आवाज म्हणून ते ओळखले जात.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.महाराष्ट्र एकीकरण समितीचे ते एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जात.त्याचबरोबर त्यांना सीमा प्रश्नाची चांगली जाणीव होती. अत्यंत परखडपणे ते आपला विचार मांडत असत. तालुक्यातील जनतेत त्यांचा मोठा जनसंपर्क होता.येळ्ळूर आणि परिसरातील मराठी भाषिक तसेच युवा कार्यकर्त्यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनात्मक कार्याचा प्रचार आणि प्रसारात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

Tags: