चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयूर केंद्रावर पार पडलेल्या कृषी प्रात्यक्षिक परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, विजापूर शहरात कर्नाटक शेतकरी संघटना आणि हसीरू सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिलेल्या तब्बल ७४ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवल्याने निकालाबाबत संशय निर्माण झाला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. राज्यातील १६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली असून धारवाड आणि कलबुर्गी येथे केवळ दोन ते तीन उमेदवारांना सर्वोच्च गुण मिळाले आहेत, मात्र हिरीयूर परीक्षा केंद्रावर एकाच वेळी ७४ उमेदवारांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्यामुळे या प्रक्रियेवर संशय बळावला आहे, असे एका विद्यार्थिनीने बोलताना सांगितले.

या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.


Recent Comments