Athani

कोकटनूर कॉलेज चोरी प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक

Share

कोकटनूर येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात झालेली चोरी उघडकीस आणण्यात ऐगळी पोलिसांना यश आले असून, अवघ्या २४ तासांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासह खोलीचे कुलूप तोडून लॅपटॉप आणि प्रोजेक्टरची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून दर्शन होनकांबळे आणि राकेश होनकांबळे या दोघांना अटक केली. आरोपींकडून १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी ऐगळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांच्या या तत्पर कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी कौतुक केले आहे.

Tags: