Khanapur

खानापूरमध्ये लोंढा रेल्वे गेटजवळ हरणाचे दर्शन

Share

खानापूर तालुक्यातील लोंढा रेल्वे गेटजवळ एक हरीण नजरेस पडले असून या दृश्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पक्षाची बैठक आटोपून परतणारे भाजप ब्लॉक अध्यक्ष बसवराज साणीकोप्प यांनी आपल्या कारच्या प्रकाशात हे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले.

लोंढा हा भाग पूर्णपणे जंगलव्याप्त असून येथे वन्यजीवांचा मोठा वावर आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पाण्याच्या आणि चाऱ्याच्या शोधात हे प्राणी सायंकाळच्या सुमारास मानवी वस्तीकडे येत असल्याचे चित्र आहे. बैठक संपवून परतत असताना बसवराज साणीकोप्प यांनी कारच्या हेडलाईटच्या प्रकाशात हे हरीण पाहिले. काही वेळ तिथेच थांबलेल्या या हरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Tags: