Vijayapura

बेंगळुरू ते विजापूर विशेष रेल्वे सुरू झाल्याबद्दल मंत्री एम. बी. पाटील यांनी व्यक्त केला आनंद

Share

बेंगळुरू आणि विजापूर दरम्यान हुबळी आणि गदग बायपास मार्गे विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल पायाभूत सुविधा आणि जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.

या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांचे विजापूर जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत. नैऋत्य रेल्वेने २८ जूनपर्यंत ही विशेष रेल्वे सेवा सुरू केली असून ती लवकरात लवकर कायमस्वरूपी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ही रेल्वे सेवा कायमस्वरूपी करताना प्रवाशांच्या सोयीनुसार तिच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी विनंती एम. बी. पाटील यांनी केंद्रीय मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. बेंगळुरू आणि विजापूर येथून रात्री ८ वाजता रेल्वे सुटून सकाळी ६ वाजता पोहोचेल अशी वेळ निश्चित करावी, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

Tags: