Athani

अथणीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहाकार

Share

अथणी तालुक्यातील संबरगी गावात बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने आणि वादळाने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तासाभर चाललेल्या या नैसर्गिक संकटामुळे २० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली असून अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत.

संबरगी गावात तासाभर झालेल्या वादळी पावसामुळे शेकडो झाडे आणि वीज खांब कोसळले आहेत. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, घरांवरील पत्रे सुमारे २०० फूट दूरवर उडून गेले. मुख्य महामार्गावरही घरांची छपरे उडून पडलेली पाहायला मिळाली.

घरातील अन्नधान्य आणि संसारोपयोगी वस्तू पावसामुळे पूर्णपणे भिजून खराब झाल्या आहेत. यामुळे गावात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Tags: