राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांच्या समर्थकाने अनोखी शपथ घेतली आहे. सवदी यांना मंत्रिपद न मिळाल्यास ते मंत्रिपद मिळेपर्यंत डोक्याचे केस आणि मिशी काढून फिरणार असल्याचे समर्थक प्रदीप नंदगाव यांनी सांगितले.

अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांना यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना प्रदीप नंदगाव यांनी सवदी यांना मंत्रिपद मिळालेच पाहिजे, अशी भूमिका मांडली. लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपद न मिळाल्यास ते मंत्रिपद मिळेपर्यंत डोक्याचे केस आणि मिशी काढून फिरण्याचा निर्धार केला असल्याचे प्रदीप नंदगाव यांनी सांगितले. आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ त्यांनी ही भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले.

यावेळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावरही प्रदीप नंदगाव यांनी आरोप केले. बी. वाय. विजयेंद्र यांच्या राजकीय भविष्यासाठी येडियुरप्पा यांनी लक्ष्मण सवदी यांच्यावर अन्याय केला असल्याचा दावा त्यांनी केला. लक्ष्मण सवदी यांच्या राजकीय वाढीची भीती असल्यानेच असा प्रकार करण्यात आल्याचा आरोप करत, यावेळी तरी सवदी यांना योग्य सन्मान देऊन मंत्रिपद द्यावे, अशी मागणी प्रदीप नंदगाव यांनी केली.


Recent Comments