बागलकोट जिल्ह्यातील इळकल शहरानजीक राष्ट्रीय महामार्गावर आज भीषण अपघात झाला. आंबे घेऊन वेगाने जाणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला असून महामार्गावर सर्वत्र आंब्यांचा खच पडला होता.


बागलकोट जिल्ह्यातील इळकल शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्ग ५० वर ही घटना घडली. आंब्यांनी भरलेला ट्रक वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो थेट दुभाजकाला धडकून उलटला. या अपघातात ट्रकमधील शेकडो क्विंटल आंबे रस्त्यावर विखुरले गेले. सुदैवाने या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही.


अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. रस्त्यावर सर्वत्र आंबे पसरल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच इळकल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी तातडीने क्रेन बोलावून ट्रक बाजूला केला आणि रस्ता स्वच्छ करून वाहतूक सुरळीत केली.


Recent Comments