Vijayapura

विजापूरमध्ये जानवे काढल्याप्रकरणी ब्राह्मण समाजाचे आंदोलन

Share

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे जानवे काढल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी विजापूर शहरात ब्राह्मण समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.

परीक्षेत जानव्याचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ कामावरून काढून त्यांच्यावर कडक शिस्तभंगविषयक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. सीईटी परीक्षेत ब्राह्मण विद्यार्थ्यांचे जानवे काढणाऱ्या महाविद्यालय प्रशासनावर कठोर कारवाई करावी, असा इशारा ब्राह्मण समाजाचे नेते अरविंद कुलकर्णी यांनी सरकारला दिला आहे. ही घटना संपूर्ण समाजासाठी मानहानीकारक असून दोषींवर कारवाई व्हावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी अरविंद कुलकर्णी यांनी केली.

Tags: