दावणगेरेनंतर आता बागलकोट काँग्रेसमध्येही अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून बीडीसीसी बँकेच्या उपाध्यक्षांसह तिघा प्रमुख नेत्यांना पक्षातून निलंबित करण्याचे आदेश जिल्हाध्यक्षांनी दिले आहेत.

पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध काम केल्याचा आणि पक्ष संघटनेला बाधा पोहोचवल्याचा ठपका ठेवत बीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष मुरुगेश कडलमट्टी, कमतगी नगरपंचायत सदस्य गुरु पाटील आणि रमेश जमखंडी यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष एस.जी. नंजैय्यनमठ यांनी ही कडक कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कमतगी नगरपंचायतीचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी या नेत्यांविरुद्ध लेखी तक्रार केली होती. हे तिन्ही नेते पक्षाच्या हिताच्या विरोधात काम करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांनी त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते, मात्र त्यांचे उत्तर समाधानकारक नसल्याने ही कारवाई करण्यात आली


Recent Comments