Vijayapura

इंगळेश्वर ते बिसनाळ रस्त्याची दुरवस्था

Share

विश्वरत्न बसवण्णा यांची जन्मभूमी असलेल्या इंगळेश्वर ते बिसनाळ या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चिखलमय रस्त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचे हाल होत असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राज्य शेतकरी संघटनेचे सरचिटणीस अरविंद कुलकर्णी बोलत होते. पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ता नेमका कोणत्या विभागाच्या अखत्यारीत येतो, हे सांगण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.

या रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास शेतकऱ्यांच्या वतीने मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अरविंद कुलकर्णी यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेला अनेक शेतकरी नेते उपस्थित होते आणि त्यांनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

रस्ता दुरुस्तीबाबत अधिकारी टोलवाटोलवी करत असून कोणाकडेही स्पष्ट उत्तर नाही, अशी टीका अरविंद कुलकर्णी यांनी केली.

Tags: