राष्ट्रीय गो सन्मान दिवस घोषित करण्याच्या मागणीसाठी धारवाडमध्ये विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत तीव्र निदर्शने केली. आंदोलकांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आपली आक्रमक भूमिका मांडली.


श्री वेदमाता गो शाळा ट्रस्टचे बसवानंद स्वामीजी मनगुंडी यांच्या नेतृत्वाखाली आणि श्री राम सेनेच्या वतीने धारवाडमधील तहसीलदार कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. गोमाता ही हिंदू समाजासाठी अत्यंत पूजनीय आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यामुळे तिला राष्ट्रीय स्तरावर योग्य सन्मान मिळण्यासाठी ‘राष्ट्रीय गो सन्मान दिवस’ साजरा करण्याची घोषणा सरकारने करावी, अशी मागणी बसवानंद स्वामीजी यांनी केली.
या मागणीचे निवेदन धारवाड तहसीलदारांमार्फत सरकारला पाठवण्यात आले असून आंदोलकांनी आपल्या भावना प्रशासनासमोर व्यक्त केल्या.


Recent Comments