Athani

अथणी : लॉजमधील वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक

Share

अथणी तालुक्यातील बळ्ळीगेरी गावाच्या हद्दीतील प्रशांत हॉटेल अँड लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणी लॉज मालकासह दोघांना अटक करण्यात आली असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लॉज मालक सरदार भगवंत कांबळे हा महिलेच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अथणी पोलिसांनी छापा टाकून मालक सरदार कांबळे आणि प्रविण मल्लारी या ग्राहकाला अटक केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी पीडित महिलेला सुरक्षित बाहेर काढले आहे. या प्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: