Khanapur

धावत्या बसमधून पडून मायलेक गंभीर जखमी

Share

खानापूर तालुक्यातील देसूर क्रॉसजवळ धावत्या बसमधून पडून मायलेक गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर-बेळगाव-खानापूर मार्गावरील बसमध्ये हा अपघात घडला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खानापूरकडून बेळगावच्या दिशेने बस वेगाने जात असताना दरवाजाजवळ उभा असलेला स्नेहिल कडोली अचानक खाली पडला. मुलाला पडताना पाहून घाबरलेल्या लक्ष्मी कडोली यांनी त्याला वाचवण्यासाठी स्वतः बसमधून उडी घेतली, अशी माहिती लक्ष्मी कडोली यांनी दिली.

खानापूर ते बेळगाव प्रवासादरम्यान चालक अतिशय वेगाने बस चालवत होता. चालकाच्या बेजबाबदारपणामुळेच मुलगा बसमधून खाली फेकला गेला आणि त्याला वाचवण्यासाठी मला उडी घ्यावी लागली, अशी प्रतिक्रिया लक्ष्मी कडोली यांनी व्यक्त केली.

बसमध्ये प्रवाशांची गर्दी जास्त होती, त्यामुळे दरवाजाजवळ उभे न राहता आत येण्याच्या सूचना वाहकाने दिल्या होत्या. तरीही ते दरवाजाजवळ उभे राहिले आणि देसूरजवळ हा अपघात घडला, यात चालकाची कोणतीही चूक नाही, असे चालक देवराज काशिनाथ यांनी स्पष्ट केले.

Tags: