जिल्ह्यातील तुळशीगेरी येथील आंजनेय मंदिराच्या यात्रेचा उत्साह सुरू असतानाच एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. देवाच्या पूजेसाठी पवित्र पाणी आणण्यासाठी कृष्णा नदीवर गेलेल्या एका १९ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, महांतेश लोकूर (१९) असे मृत तरुणाचे नाव आहे. तुळशीगेरी येथील आंजनेय यात्रेनिमित्त गावकरी परंपरेनुसार गंगापूजनासाठी नदीवर गेले होते. बिलगी तालुक्यातील जुन्या कोर्ती गावाजवळ नदीतून पाणी काढत असताना महांतेशचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात वाहून गेला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने शोधमोहीम राबवून महांतेशचा मृतदेह बाहेर काढला. ऐन तारुण्यात मुलाचा असा अंत झाल्याने कुटुंबाने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. बिलगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. भक्तीभावाने देवाची सेवा करायला गेलेला तरुण मृतदेहाच्या स्वरूपात परतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Recent Comments