Dharwad

धारवाडमध्ये भिंत कोसळून एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Share

धारवाडमधील गवळी गल्लीत मध्यरात्री लघुशंकेसाठी थांबले असताना अचानक भिंत कोसळून एका ३७ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

धारवाड शहराच्या टिकारे रोडवरील गौळी गल्लीत राहणारे मारुती महादेव काटकर (३७) हे या घटनेतील मृताचे नाव आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास मारुती हे घराबाहेर लघुशंकेसाठी गेले असता, जीर्ण झालेली भिंत अचानक त्यांच्या अंगावर कोसळली.

घटनेची माहिती मिळताच धारवाड शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून, याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Tags: