बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यात मध्यरात्री एका व्यक्तीची दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. तुंगळ गावात घराबाहेर झोपलेल्या दोन व्यक्तींवर अज्ञातांनी हल्ला केला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

जमखंडी तालुक्यातील तुंगळ गावात मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. घरासमोरील अंगणात अशोक कोळी आणि उत्तम शिंदे हे दोघे झोपले होते. यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. झोपेत असलेल्या अशोक कोळी यांच्या डोक्यात दगड घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या शेजारीच झोपलेले उत्तम शिंदे यांच्यावरही हल्ला करण्यात आला असून ते या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिकांनी जखमी उत्तम शिंदे यांना तातडीने जमखंडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सावळगी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तैनात केली असून तपास अधिक तीव्र केला आहे.


Recent Comments