Athani

अथणी तालुक्यातील शिरहट्टीमध्ये महाकाय मगर जेरबंद

Share

अथणी तालुक्यातील शिरहट्टी गावामध्ये १२ फूट लांबीच्या अवाढव्य मगरीला ग्रामस्थांनी जेरबंद केल्याची घटना घडली आहे.

कृष्णा नदीच्या काठावर ही मगर दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर, स्थानिक नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत धाडसी मोहीम राबवून या मगरीला पकडले. मगरीला पकडल्यानंतर या घटनेची माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मगरीला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर या मगरीला सुरक्षितपणे हिडकल्ल जलाशयामध्ये सोडण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

Tags: